Poonam Pandey: मी जिवंत आहे!! पूनम पांडेने व्हिडिओ शेअर करत दिला निधनाच्या अफवांना पूर्णविराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Poonam Pandey| शुक्रवारी लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या पूनम पांडेच्या (Poonam Pandey) बातमीने सर्वत्र खळबळ वाजवली होती. सर्वायकल कॅन्सरमुळे (Cervical Cancer) पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यामुळे सर्वांनाच याचा धक्का बसला होता. सोशल मीडियावर देखील या संबंधित अनेक बातम्या पसरवल्या जात होत्या. मात्र अखेर आज स्वतः पूनम पांडेने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून आपण जिवंत असल्याची माहिती सर्वांना दिली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मी जिवंत आहे…(Poonam Pandey)

पूनम पांडेने (Poonam Pandey) इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की, “तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे आणि ते म्हणजे – मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत”

त्याचबरोबर, “मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे की इतर सर्वाइकल कॅन्सर हे रोखू शकता येतं. हे कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखं नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये म्हणून आपण एवढं आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो” असे पूनमने (Poonam Pandey) या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.