हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2000 Note : 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात मोदी सरकारकडून नोटाबंदी लागू केली गेली होती. यानंतर देशात मोठ्या गाजाबजात 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. ज्याचा फार मोठा गवगवा झाला. यावेळी RBI कडून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद केल्या गेल्या. मात्र नोटाबंदीच्या काळात जारी करण्यात आलेल्या या दोन हजार रुपयांच्या नोटा आता क्वचितच पाहायला मिळतात. आता बँकांच्या एटीएममध्येही 2000 हजार रुपयांच्या नोटा पहायला मिळत नाहीत. बाजारातही या नोटांचा फार कमी वापर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता 2000 च्या नोटा गेल्या कुठे ??? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
RBI च्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक 2000 च्या नोटा चलनात होत्या. यादरम्यान बाजारात सुमारे 33,630 लाख नोटा चलनात होत्या. ज्याची एकूण किंमत 6.72 लाख रुपये होती. मात्र आता त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे.
नोटा कुठे गेल्या ???
“2019-20 पासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही”, अशी माहिती गेल्या वर्षी केंद्र सरकारने लोकसभेत दिली. मात्र काळ्या पैशाचा साठा रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हळूहळू दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचे ठरवले आहे असे दिसून येते. 2000 Note
नोटा का दिसत नाहीत?
गेल्या वर्षी RBI कडून सांगण्यात आले होते की,” मार्च 2021 पर्यंत देशात 2000 रुपयांच्या फक्त 24,510 लाख नोटा चलनात उरल्या आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत देशात चलनात असलेल्या एकूण चलनी नोटांमध्ये 500 आणि 2000 चा वाटा 85.7% होता, जो 31 मार्च 2020 पर्यंत 83.4% होता. 2000 Note
नोटाबंदीनंतर किती नोटा चलनात आल्या?
RBI च्या म्हणण्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षापासून 2,000 रुपयांची कोणतीही नोट छापण्यात आलेली नाही. सध्या चलनात सर्वाधिक हिस्सा 500 च्या नोटांचा आहे. यानंतर 10 रुपयांच्या नोटेचा वाटा आहे. याबाबत तज्ञ सांगतात की,”उच्च मूल्याच्या नोटांच्या छपाईचा खर्च देखील जास्त आहे, त्यामुळे RBI कमी प्रमाणात 2 हजारांच्या नोटांची छपाई करत आहे.” 2000 Note
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/Notification.aspx?Id=2652
हे पण वाचा :
FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!
IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदी मध्ये घसरण
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा