Wednesday, February 8, 2023

पॉझिटीव्ह दर कायम : सांगली जिल्ह्यात नवे 954 बाधित तर 27 जणांचा मृत्यू

- Advertisement -

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कायम राहिला. नवे रुग्ण ९५४ रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्हीटी दर ११.७८ टक्क्यांवर गेला. तर २७ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय १०५९ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे १३६ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात २०, कडेगाव १०१, खानापूर 59, पलूस ४५, तासगाव ५५, जत ६९, कवठेमहांकाळ ५६, मिरज ८७, शिराळा ९६ आणि वाळवा तालुक्यात २३० रुग्ण आढळले. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे ३ रुग्ण आढळले तर एकाच मृत्यू झाला.

कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सरासरी साडेपाच हजारावरुन साडेसात ते आठ हजारावर नेण्यात आल्या. बुधवारी कोरोना संशयित जिल्ह्यातील ८ हजार २९० रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या २४७६ पैकी ३९० बधित तर ५८२३ अँन्टीजेन चाचणीमध्ये ५८८ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून ९५४ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट ११.७८ टक्क्यांपर्यंत खाली आला. जिल्ह्यातील २७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर ४, कुपवाड शहर १, पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी ५, जत, कवठेमहांकाळ आणि शिराळा प्रत्येकी 2, आणि कडेगाव तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

- Advertisement -

महानगरपालिका क्षेत्रात नव्याने १३६ रुग्ण आढळून आले. सांगली शहरात ११३ तर मिरज शहरात २३ रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात २०, कडेगाव १०१, खानापूर 59, पलूस ४५, तासगाव ५५, जत ६९, कवठेमहांकाळ ५६, मिरज ८७, शिराळा ९६ आणि वाळवा तालुक्यात २३० रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे ३ नवे रुग्ण आढळले आणि एकाच मृत्यू झाला. आजपर्यंत म्युकरमायकोसीसचे २२९ रुग्ण आढळून आले. तर १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख २६ हजार ४९० रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार ६४९ व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख १३ हजार ८२३ जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 9 हजार १८ रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 7 हजार १२४ बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.