महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसमधील एक गट फुटण्याच्या चर्चांना उधाण

congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करुन २ महिनेही पूर्ण झाले नाहीत त्यातच आता राज्यात अजून एक मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात काँग्रेसच्या फुटलेल्या गटाला सामील केलं जाण्याची शक्यता आहे.

येत्या ऑक्टोबर मध्ये शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसमधील एक गट फुटणार असून दोन माजी मंत्र्यांना शिंदे- फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर आता काँग्रेस मध्ये बंडाळी होणार अशा चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकी पासूनच काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस बाहेर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. काँग्रेसची हक्काची 6 मतं फुटल्याने काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.