हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात राजकीय भुकंप होऊन भाजपने शिंदे गटा सोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर आता गोव्यातही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
गोव्यात काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पार पडली होती. यावेळी भाजपने बाजी मारत सत्तास्थापन केलं. काँग्रेसला अवघ्या 11 जागांवर विजय मिळाला होता. मात्र त्यातीलही 8 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोवा काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने मात्र या गोष्टींचा इन्कार केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हंटल की, आमदार भाजपच्या वाटेवर आहेत या फक्त अफवा आहेत, अस काहीही नाही. सरकार कडून संभ्रम आणि अफवा पसरवली जात आहे असा आरोप त्यांनी केला.