नवी दिल्ली । जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा धोका नको असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न देखील मिळतात. पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना अधिक चांगल्या आहेत. कमी खर्चात यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे मिळतात. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे – पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit). यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात.
पोस्ट ऑफिस RD योजना काय आहे?
एकूणच, या योजनेद्वारे, तुम्ही खूप कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. या व्यतिरिक्त, तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता यासाठीची मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट खाते हे लहान हप्ते आणि चांगल्या व्याजा बरोबरच सरकारी हमी असलेली योजना आहे.
तुम्हाला किती व्याज मिळेल ?
पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले RD खाते 5 वर्षांसाठी असते. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी उघडले जात नाही. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या रकमेवर व्याज मोजले जाते. त्यानंतर प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याजासह जोडले जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या RD योजनेवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार आपल्या सर्व लहान बचत योजनांमध्ये दर तिमाहीत व्याज दर जाहीर करते.
जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 16 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील
जर तुम्ही पोस्ट ऑफिस RD योजनेमध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर मॅच्युर झाल्यावर तुम्हांला 16,26,476 लाख रुपये मिळतील.
RD खात्याबद्दल काही खास गोष्टी
जर तुम्ही RD चा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्यासाठी विलंब झाल्यास तुम्हाला दरमहा एक टक्के दंड भरावा लागेल. यासह, जर तुम्ही सलग 4 हप्ते जमा केले नाहीत तर तुमचे खाते बंद होईल. तथापि, जेव्हा खाते बंद होते तेव्हा पुढील 2 महिन्यांत ते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.