हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. यामधील अनेक योजना या खूप लोकप्रिय देखील आहेत. तसेच सरकारचा सपोर्ट असल्यामुळे या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका देखील नाही.ज्यामुळे लाखो लोकं पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात.
हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकार कडून नुकतेच काही लहान बचत योजनांवरील व्याजदर वाढवले गेले आहेत. जर आपणही गुंतवणुक करणार असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरू शकेल.
या योजनांच्या व्याज दरांमध्ये झाली वाढ
केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम, दोन आणि तीन वर्षांसाठीचे टाइम डिपॉझिट्स स्कीम, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून ही दर वाढ लागू देखील झाली आहे. Post Office
मंथली इनकम स्कीम
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमच्या व्याजदरात 10 बेसिस पॉईंट्सनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी यावर 6.6 टक्के दराने व्याज दिले जात होते. मात्र आता यामध्ये 6.7 टक्के दराने व्याज मिळणार आहे. Post Office
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
केंद्र सरकार कडून पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत 7.4 टक्के दराने व्याज मिळत होते, जे आता 7.6 टक्के झाले आहे. Post Office
किसान विकास पत्र
या योजनेअंतर्गत पहिल्या 124 महिन्यांसाठी 6.9 टक्के दराने व्याज दिले जात होते. मात्र केंद्र सरकारने व्याजदर वाढवल्यानंतर आता या योजनेंतर्गत 123 महिन्यांच्या मॅच्युरिटीवर 7 टक्के दराने व्याज मिळेल. Post Office
टाइम डिपॉझिटमधील व्याजदर
हे लक्षात घ्या कि, पहिली दोन वर्षे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 5.5 टक्के व्याज दिले जात होते. मात्र आता त्यामध्ये 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर व्याजदर 5.7 टक्के झाला आहे. त्याच बरोबर तीन वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर 30 बेसिस पॉइंट्सचे व्याज वाढवण्यात आले आहे. याआधी यावर 5.5 टक्के दराने व्याज दिले जात होते. आता हा दर 5.8 टक्के झाला आहे. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत या योजनांच्या व्याजदरात कपात केली गेली होती. मात्र त्यानंतर आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा
Telegram ने भारतीय युझर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!
‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!