हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागरिकांना गुंतवणुकीसाठी अनेक छोट्या बचत योजना ऑफर केल्या जातात. या योजना गुंतवणुकीसाठी खूप सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच ज्यांना जास्त धोका पत्करायचा नाही अशी लोकं यामध्ये भरपूर गुंतवणूक करतात. तसेच या योजनांना सरकारकडून सपोर्ट देखील केला जातो. यामुळे लोकही त्यावर जास्त विश्वास ठेवतात. यासोबतच त्यामध्ये निश्चित रिटर्न देखील दिला जातो
Post Office ची मंथली इन्कम स्कीम देखील अशीच एक योजना आहे ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो. या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज दिले जाते. ही योजना पाच वर्षांनी मॅच्युर होते. मॅच्युरिटी नंतर ती आणखी पाच वर्षांसाठी वाढवता देखील येते. यामध्ये जर खातेदाराचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर नॉमिनीला त्याचे पैसे दिले जातील. इथे हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते.
अशा प्रकारे पाच हजार रुपये मंथली इन्कम मिळवा
Post Office च्या या मंथली इन्कम स्कीममध्ये 6.6 टक्के वार्षिक दराने व्याज दिले जाते. जर एखाद्याने यामध्ये जॉईंट अकाउंटद्वारे 9 लाख रुपये गुंतवले तर त्याला वार्षिक 6.6 टक्के दराने 59,400 रुपये मिळतील. एका महिन्याच्या कॅल्क्युलेशननुसार पहिले तर हे 4,950 रुपये असेल. हे दर महिन्याला घेता येऊ शकेल. इथे ही फक्त व्याजाची रक्कम असेल म्हणजेच गुंतवणूकदाराची मूळ रक्कम आहे तशीच राहील.
किती गुंतवणूक करता येईल ???
Post Office च्या मंथली इन्कम स्कीम अंतर्गत सिंगल आणि जॉईंट अकाउंट उघडता येतील. यामध्ये सिंगल अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये तर जॉईंट अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतील. तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणूक करता येईल.
एक वर्षापूर्वी रक्कम काढता येणार नाही
या मंथली इन्कम स्कीम मध्ये आपल्याला 1 वर्षापूर्वी पैसे काढता येणार नाही. दुसरीकडे, जर मॅच्युरिटी आधीच म्हणजेच 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर मूळ रकमेपैकी फक्त 1% रक्कम परत केली जाईल. दुसरीकडे, जर मॅच्युरिटी नंतर पैसे काढले तर या योजनेचे सर्व फायदे मिळतील. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!
Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!
FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा