Post Office Scheme For Women । सर्वसामान्य स्त्रिया घरगुती बचत, भिशीद्वारे बचत करत असतात. स्त्रियांकडे पैसा शिल्लक राहतो. त्या जास्तीचा खर्च टाळतात आणि बचत करून संसारात हातभार लावतात. पोस्टात गुंतवणूक करणे महिलांसाठी आता फायदेशीर ठरणार आहे. पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. एकतर पोस्टातील गुंतवलेली रक्कम कधीही बुडत नाही; परंतु व्याज मात्र चांगले मिळू शकते. महिलांसाठी पोस्टाने गुंतवणुकीच्या 5 योजना आणल्या असून या गुंतवणुकीवरील करामध्ये सुद्धा सवलत मिळते. महिलांसाठी पोस्टाच्या महत्वाच्या योजना कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.
१) सुकन्या समृद्धी योजना
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे केंद्र सरकारचे विशेष अभियान आहे. या अभियानांतर्गत 10 वर्षांपर्यतच्या मुलींसाठी पोस्ट ऑफिसने विशेष योजना आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना असे या योजनेचं नाव असून मुलीच्या जन्मानंतर तुम्ही हे खाते उघडू शकता. या योजनेसाठी 250 रुपयांपासून ते 1.5 लाखांची गुंतवणूक अपेक्षित आहे. पोस्टाच्या या योजनेतील ठेवींवर 8 टक्के व्याज दर मिळतो.
२) PPF – सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना
महिलांना दीर्घकालीन बचत करायची असेल तर PPF ही बचत योजना पोस्टामध्ये उपलब्ध आहे. यामुळे महिलांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. सरकार या योजनेतील ठेवीवर 7.1 टक्के व्याजदर देते. महिलांनी प्रति वर्षी 1 लाख रुपयांची गुंतवणूक सलग 15 वर्षे गुंतवणूक केली तर नंतर मिळणारी रक्कम जवळपास दुप्पट म्हणजे 31 लाख रुपये अशी मिळते.
३) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट- Post Office Scheme For Women
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय महिलांसमोर उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किमान 1000 रुपये ते पुढे कितीही रक्कम गुंतवण्याचा पर्याय आहे. या योजनेतील ठेवींवर व्याज दर 7.7 टक्के दर मिळतो. ही योजना 5 वर्षे कालावधीची आहे.
४) टाइम डिपॉझिट स्कीम
पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम ही योजना (Post Office Scheme For Women) महिलांना चांगली रक्कम मिळवून देणारी आहे. दर महिन्याला सलग 5 वर्षे ठराविक रकमेचे हप्ते भरले तर व्याजाचा दर 7.5 टक्के असा आहे. या गुंतवणुकीत महिलांना आर्थिक लाभ होतो.
५) महिला सन्मान बचत योजना
महिलांना आर्थिक सबळ करण्यासाठी पोस्ट विभागाने आणलेल्या ही 5 वी योजना आहे. केंद्र सरकारने ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी सुरु केली आहे. महिलांनी या योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये गुंतवल्यानंतर जमा रकमेवर त्यांना 7.5 टक्के व्याज दर मिळतो. या योजनेची मुदत 2 वर्षांसाठी असून ही योजना महिलांना परवडणारी आहे.