हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर नफा मिळवता येतो. जर आपल्याला दरमहा 2500 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची पेन्शन हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या मंथली सेव्हिंग स्कीमबाबत जाणून घ्या.
एकरकमी गुंतवणूक करावी लागेल
Post Office ची मंथली सेव्हिंग स्कीम ही एक लहान बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून दर महिन्याला खात्रीशीर रिटर्न मिळेल. देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसद्वारे या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. जर यामध्ये 4 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर दरमहा 2500 रुपयांपेक्षा जास्त रिटर्न मिळेल. सध्या या योजनेत 7.1% दराने व्याज दिले जात आहे. मासिक पेन्शन मिळत असल्याने निवृत्त झालेल्या लोकांसाठी ही योजना सर्वात चांगली ठरेल. याशिवाय सरकारी Post Office असल्याने यामध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षितही राहतील.
किती पैसे गुंतवावे लागतील ???
या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. यानंतर, संपूर्ण रक्कम परत केली जाईल. तसेच यामध्ये जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवता येतील. जर याहून जास्तीची गुंतवणूक करायची असेल, तर जॉईंट अकाउंट उघडून 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्याच बरोबर या योजनेमध्ये सुरुवातीला 1000 रुपयांद्वारेही गुंतवणूक करता येईल.
मॅच्युरिटीवर काढा पैसे
हे लक्षात घ्या कि, या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे एका वर्षाआधी काढता येणार नाहीत. तसेच जर मॅच्युरिटीपूर्वी यातून पैसे काढले तर गुंतवलेल्या मूळ रकमेपैकी 1% रक्कम कपात केली जाईल. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी Post Office मध्ये बचत खाते उघडण्याचीही गरज नाही. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तींना यामध्ये गुंतवणूक करता येते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे मिळवा दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन
Investment Tips : कर्ज, इक्विटी किंवा विमा यांपैकी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा कुठे आहे ??? तज्ञांकडून समजून घ्या
नवीन वर्षात PNB च्या ‘या’ FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा 8.10% व्याज
शेतकऱ्यांना लवकरच मिळू शकतील PM Kisan Yojana च्या13 व्या हफ्त्याचे पैसे !!! मात्र पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम
Financial Changes : 1 जानेवारीपासून ‘हे’ नवे नियम लागू, त्याविषयी जाणून घ्या