हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकाला सतावत असते. अशातच जर मुलगी असेल तर या चिंतेत आणखीनच भर पडते. तिचे शिक्षण आणि विशेषतः लग्नासाठी पालकांकडून अनेक प्रकारच्या तजवीज केल्या जातात. जर आपल्यालाही अशी चिंता लागून राहिली असेल तर यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. यापैकीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY). याद्वारे मिळणाऱ्या रिटर्न द्वारे आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी एक चांगला फंड जमा करता येऊ शकेल
हे लक्षात घ्या की, सध्या या योजनेमध्ये 7.6 टक्के दराने व्याज दर दिला जात आहे. जो FD, RD, NSC आणि PPF सारख्या इतर लहान बचत योजनांपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय, सरकारी गॅरेंटीमुळे यामध्ये गुंतवलेले पैसे देखील 100% सुरक्षित राहतील. Post Office
कर सवलतीचा लाभ
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. यामध्ये, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 1.50 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर कर सवलत ट दिली जाईल. तसेच, त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर द्यावा लागणार नाही. याशिवाय मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त असेल. Post Office
इतके व्याज मिळेल
जर आपण या योजनेमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर एका वर्षात या योजनेमध्ये एक लाख 20 हजार रुपये जमा होतील. ज्यावर वार्षिक 7.7 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच ही गुंतवणूक एकूण 15 वर्षांसाठी करावी लागेल. अशा प्रकारे या 15 वर्षांत एकूण 18 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. Post Office
मॅच्युरिटीवर मिळतील इतके पैसे
इथे हे लक्षात घ्या की, ही योजना 21 वर्षानंतर मॅच्युर होईल. ज्यानंतर आपल्याला एकूण 50,92,124 रुपयांचा रिटर्न मिळेल. यामध्ये व्याजाच्या स्वरूपात आपल्याला एकूण 32,92,124 रुपयांचा लाभ मिळेल. अशा प्रकारे, या योजनेमध्ये आपल्याला 183% रिटर्न मिळेल. Post Office
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89
हे पण वाचा :
Business Idea : ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करून अशा प्रकारे दरमहा मिळवा हजारो रुपये
Train Ticket Refund : ट्रेन चुकल्यानंतरही दिला जातो रिफंड, कसे ते जाणून घ्या
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव