हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपण नोकरीव्यतिरिक्त एखाद्या नियमित उत्पन्नाच्या पर्यायाच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. हे जाणून घ्या कि, या योजनेमध्ये एकरकमी रक्कम जमा करून दरमहा कमाईची संधी मिळते. पोस्ट ऑफिस स्कीम असल्याने यामध्ये गुंतवलेले आपले पैसे देखील सुरक्षित राहतात. याबरोबरच गुंतवणूकदारांना 6.6 टक्के इतका रिटर्नही मिळतो. ही योजना 5 वर्षांची आहे, जी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवता येईल.
फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येईल
Post Office च्या मंथली इनकम स्कीममध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाल गुंतवणूक करता येते. या अंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. तसेच वयाची 18 वर्षे असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे खाते उघडता येते. तसेच यामध्ये सिंगल आणि जॉईंट पद्धतीनेही खाती उघडण्याची सुविधा आहे. यामध्ये एका व्यक्तीला एकाच वेळी जास्तीत जास्त 3 खातेदारांसह खाते उघडता येते. या योजनेमध्ये एका खात्याद्वारे जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवता येतात. त्याच वेळी, जॉईंट अकाउंट द्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
9 लाख रुपयांची गुंतवणूक करून मिळवा दरमहा 4950 रुपये
Post Office योजने,ध्ये वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. त्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. जर जॉईंट अकाउंट मध्ये एकरकमी 9 लाख रुपये जमा केले तर 5 वर्षांनंतर 6.6 टक्के वार्षिक व्याजदराने या रकमेवर एकूण 59,400 रुपये व्याज म्हणून मिळतील. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत दिली जाईल. अशा प्रकारे, दरमहा व्याज सुमारे 4,950 रुपये असेल. तसेच जर एकाच खात्यातून 4.50 लाख रुपये जमा केले तर मंथली व्याज 2475 रुपये असेल.
1 वर्ष होण्याआधीच पैसे काढता येणार नाही
हे खाते उघडण्याची एक अट अशी आहे की यामध्ये 1 वर्ष होण्याआधीच पैसे काढता येणार नाहीत. दुसरीकडे, जर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ते वजा केल्यावर 1 टक्केच मूळ रक्कम परत केली जाईल. त्याचबरोबर, जर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर योजनेचे सर्व फायदे मिळतील. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Canara Bank कडून FD वरील व्याज दरात बदल !!! नवीन दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर तपासा
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
Axis Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!