हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office मध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये बँकेपेक्षा जास्त व्याज देखील मिळते. तसेच यामधील गुंतवणूक सुरक्षित राहण्याबरोबरच खात्रीशीर रिटर्न देखील देते. ज्यामुळे देशातील लोकं बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्येच गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांत मॅच्युर होतात. तसेच जर कधी यामधून मुदती आधीच पैसे काढायचे असतील तर यासाठी दंड म्हणून काही रक्कम द्यावी लागेल. चला तर मग आज आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेमधून मुदतीआधीच पैसे काढण्यावर किती दंड द्यावा हे जाणून घेउयात…
पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड
या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे, मात्र त्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. यामध्ये 5 वर्षांनंतर काही अटींद्वारे पैसे काढता आणि खाते बंद करता येते. मात्र हे खाते उघडण्याच्या तारखेपासून ते बंद होण्याच्या तारखेपर्यंत 1% व्याज कापले जाईल. Post Office
रिकरिंग डिपॉझिट्स
Post Office चे रिकरिंग डिपॉझिट्स खाते देखील 5 वर्षांसाठी आहे. या खात्यातील गुंतवणूकदारांना 3 वर्षांनंतर पैसे काढता येतात. मात्र मुदती आधी यामधून पैसे काढल्यावर फक्त बचत खात्यानुसार व्याजदर मिळेल.
सीनियर सिटीजन्स सेव्हींग स्कीम
Post Office च्या योजनेतही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच यामधील रक्कम हे खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी मॅच्युर होते. मात्र जर पाच वर्षाआधीच यामधून पैसे काढायचे असतील तर काही प्रमाणात दंड भरावा लागेल. यामध्ये, 2 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढण्यावर डिपॉझिट्सच्या रकमेतील 1.5% रक्कम वजा केली जाईल आणि 2 वर्षानंतर पैसे काढण्यासाठी 1% रक्कम दंड म्हणून कापली जाईल.
किसान विकास पत्र
124 महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करणाऱ्या या योजनेचा लॉक-इन कालावधी 30 महिन्यांचा आहे. या योजनेतून 1 वर्षाआधी पैसे काढल्यास त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. यासोबतच गुंतवणूकदाराला दंडही भरावा लागेल. 1 वर्ष ते 2.5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यावर व्याज मिळेल, मात्र रक्कम कट केली जाईल. तसेच 2.5 वर्षांनंतर पैसे काढले गेल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. त्याप्रमाणे त्यावेळी असलेल्या व्याज दरानुसार रिटर्न दिला जाईल.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम
Post Office च्या या योजनेमध्ये, 5 वर्षांसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. यामध्ये 5 वर्षानंतर पैसे परत मिळतात. तसेच याद्वारे 5 वर्षांनंतर दरमहा एक निश्चित रक्कम उत्पन्न म्हणून मिळते. मात्र जर आपण 5 वर्षापूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर दंड भरावा लागेल
यामध्ये जर एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर डिपॉझिट्सच्या रकमेपैकी 2% कट केली जाईल. तसेच, जर खाते तीन वर्षांपेक्षा जुने असेल तर जमा केलेल्या रकमेतून 1% कट करून रक्कम परत केली जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये