हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालविल्या जातात. या योजना गुंतवणुकीसाठी बचतीचे एक चांगले साधन असल्याचे सिद्ध देखील झाले आहे. हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त आहेत. तसेच यामध्ये चांगला रिटर्न देखील मिळतो. Post Office च्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना या कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचाही समावेश आहे.
या ग्राम सुरक्षा योजनेमध्ये दररोज फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करून 35 लाख रुपयांचा रिटर्न मिळू शकेल. म्हणजेच या योजनेमध्ये दरमहा 1500 रुपये जमा केल्यास 35 लाख रुपये मिळू शकतील.
यासाठीचे नियम काय आहेत ???
हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससहीत मिळते. तसेच यामध्ये, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण होण्याआधी मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ही रक्कम दिली जाते.
कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ???
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये कमीत कमी 10,000 ते 10 लाख रुपये गुंतवता येतात. यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. Post Office
कर्ज सुविधा देखील मिळेल ???
ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केल्यानंतर कर्ज सुविधा देखील मिळेल. मात्र, पॉलिसी खरेदी केल्यापासून 4 वर्षांनीच कर्ज घेता येईल. याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान प्रीमियम भरण्यात डिफॉल्ट झाल्यास प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ते पुन्हा सुरू करता येईल. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा