नवी दिल्ली । सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी अनेक योजनांवर आकर्षक रिटर्नचा दावा केला जात आहे. मात्र, त्यांच्यापैकी काहींमध्ये जोखीम दर खूप जास्त आहेत. अनेक गुंतवणूकदार कमी फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. खरं तर, त्यामध्ये कमी धोका असतो. मात्र, काही गुंतवणूक योजनांमध्ये चांगला रिटर्न मिळण्याबरोबरच जोखीमही कमी असते. तुम्हीही अशा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
भारतीय पोस्टची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये कमी जोखमीमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, बोनससह इन्सुरन्सची रक्कम एकतर वयाच्या 80 व्या वर्षी किंवा कायदेशीर वारस किंवा नॉमिनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळते.
योजनेच्या अटी आणि नियम
19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत 10,000 ते 10 लाख रुपयांची किमान गुंतवणूक करता येते. या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरता येऊ शकतो. ग्राहकाला प्रीमियम पेमेंटसाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील दिला जातो. ही पॉलिसी मुदतीदरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.
तुम्ही कधी सरेंडर करू शकता?
ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी त्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस. शेवटच्या घोषणेनुसार, प्रति वर्ष 1,000 रुपये प्रति 65 रुपये बोनसचे आश्वासन दिले होते. ही इन्शुरन्स स्कीम कर्ज सुविधेसह येते, जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी मिळू शकते. सोप्या शब्दात समजायचे तर पॉलिसीधारक 4 वर्षांनंतर त्यावर कर्ज घेऊ शकतो.
मॅच्युरिटी वर फायदे
जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी बेनेफिट मिळेल. त्याच वेळी, 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनेफिट 34.60 लाख रुपये असेल.
माहिती कुठे मिळेल?
नॉमिनी नाव किंवा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखे डिटेल्स अपडेट करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक टोल फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट http://www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकतात.