हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पुढील महिन्यापासून PPF आणि सुकन्या समृद्धी सहित पोस्ट ऑफिस बचत योजनांवर जास्त व्याज दिले जाण्याची शक्यता आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सरकार अल्पबचतींवरील व्याजदरात वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे जाणून घ्या कि, दर तीन महिन्यांनी केंद्र सरकार कडून छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो. मात्र गेल्या 2 वर्षांपासून या अल्पबचतींवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या मार्चमध्ये झालेल्या आढाव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Post Office
चला तर मग पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील सध्याच्या व्याजदरांबद्दलची माहिती जाणून घेउयात …
सुकन्या समृद्धी योजना : 7.6%
किसान विकास पत्र: 6.9%
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी : 7.1%
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : 6.8%
सेव्हिंग डिपॉझिट्स : 4%
1 वर्षाची फिक्स्ड डिपॉझिट्स : 5.5%
2 वर्षांची फिक्स्ड डिपॉझिट्स : 5.5%
3 वर्षांची फिक्स्ड डिपॉझिट्स : 5.5%
5 वर्षांची फिक्स्ड डिपॉझिट्स : 6.7%
5 वर्षांचे RD: 5.8%
5 वर्षांचे मंथली इनकम अकाउंट : 6.6%
5 वर्षांसाठी ज्येष्ठ नागरिक संवेदना योजना : 7.4% Post Office
RBI कडून वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात 90 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे कर्जदारांना कर्जाच्या कालावधीवर जास्त व्याज द्यावे लागेल. तसेच या दर वाढीमुळे अनेक सरकारी आणि खाजगी बँकांनी आपल्या एफडी आणि आरडीच्या दरातही वाढ केली आहे. यामुळेच सरकार पुढील महिन्यापासून PPF, MIS आणि SSY सारख्या बचत योजनांचे व्याजदर वाढवू शकते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!
Bank Holidays : जुलैमध्ये तब्ब्ल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा
Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!