हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांसांठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे . सरकारने पोस्ट ऑफिस एफडी (FD), एनएससी (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह (SCSS) लहान बचत ठेव योजनांवर व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवले आहेत. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. या वाढीनंतर ठेवीदारांना छोट्या बचत योजनांवर आठ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.
नव्या व्याजदरानुसार, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 1 जानेवारीपासून 7 टक्के व्याज मिळेल, सध्या ते 6.8 टक्के आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या 7.6 टक्क्यांऐवजी 8 टक्के व्याज मिळेल. मात्र दुसरीकडे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धि योजना यामधील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
लहान बचत योजनांवर जानेवारी-मार्च 2023 साठी नवीन व्याजदर-
एक वर्ष मुदत ठेव – 6.6 टक्के
दोन वर्षांची मुदत ठेव – 6.8 टक्के
तीन वर्षांची मुदत ठेव – 6.9 टक्के
पाच वर्षांची मुदत ठेव – 7.0 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) – 7.0 टक्के
किसान विकास पत्र (KVP) – 7.2 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) – 8.0 टक्के