हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी, रामचंद्र परमहंस यांनाभारतरत्न देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. या 4 लोकांच्या मुळे बाबरी पडली. तसेच राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं. त्यामुळे त्यांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेल की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही त्यामुळे या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली
बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाला त्यांनी नेतृत्व केल्याचे यापूर्वीही तोगडिया यांनी म्हटले आहे.