महाविकास आघाडी सरकार काँग्रेसच्याच जीवावरच ; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पालिका व महापालिकांच्या निवडुका जवळ आल्याने आघाडीतील नेतेही स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करताहेत. अशात आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक असे वक्तव्य केले आहे. “राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावे, या देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. याचा मुकाबला स्वातंत्र्य पूर्वी काँग्रेसने केला आणि आता भाजप विरुध्द लढून करत आहे. आम्ही आरएसएसचा अजेंडा देशात राबवून देणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या न्हाविकास आघाडीचे सरकार आहे तर तीन पक्षांतून तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कित्येकदा महाविकास आघाडीतील धुसपूस बाहेरही आली आहे. 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर येणार आहेत. सोनिया गांधींनाही आमंत्रण दिले आहे आणि विनंती केली आहे.

यावेळी जगताप यांनी भाजपवरही निशाणा साधला. या देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. याचा मुकाबला स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने केला आणि आता भाजप विरुध्द लढून करत आहे. आम्ही आरएसएसचा अजेंडा देशात राबवून देणार नाही, असा इशाराही यावेळी जगताप यांनी दिला.

You might also like