हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 184 पंचायत समित्यामध्ये निवडणूक आयोगाकडून तुर्तास आरक्षण कार्याक्रम स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका लांबण्याची शक्यता आहे. १९ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे ५ जुलैला 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 184 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता. परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्रम 19756/2021 मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जदारावर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
त्यामुळे आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.तसेच सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. आता पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार असून याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पुढील सुनावणी नंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल