हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण, सलग सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. ज्यामुळे काहीकाळ लोड शेडींग करण्यात येऊ शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे.
सध्या फक्त 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून करण्यात येत आहे. याच कारणामुळे नागरिकांना पुन्हा लोड शेडिंगचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्रातील एकूण सात औष्णिक विद्युत केंद्रांवरून वीज निर्मिती केली जाते. परंतु आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. यामुळे ग्राहकांना कमी प्रमाणात विज पुरवली जाऊ शकते. थोडक्यात, काही काळ नागरिकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागू शकतो.
मुख्य म्हणजे, मुसळधार पावसामुळे, कोळसा ओला झाल्यामुळे आणि दुरुस्तीची काम कोळंबल्यामुळे सर्वच केंद्रावर क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीज निर्मिती केली जात आहे. पुढील काही दिवस जर ही परीस्थिती राहिली तर राज्य अंधारात जाऊ शकतो. सध्या अनेक भागातील वीज मुसळधार पावसामुळे खंडित करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लोडशेडींग सुरू आहे. मात्र तरी देखील आवश्यक तितक्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यामध्ये वीज केंद्रांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून लोड शेडिंगचा पर्याय निवडण्यात येऊ शकतो.