हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आज (४ मे )कोल्हापुरात संध्याकाळ नंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. यावेळी वीज थेट इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर वर कोसळली. त्यामुळे मोठा आवाज झाला. याचा संपूर्ण व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. प्रतिभानगर परिसरात ही वीज कोसळली आहे. या घटनेनंतर मात्र आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/312970223532148/
७ मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोल्हापुरात ट्रान्सफॉर्मरवर कोसळली वीज, पहा थरारक व्हिडीओ https://t.co/0XWMHyND9d pic.twitter.com/ig7IaVuTdc
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 4, 2021