अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट; हल्लेखोरांचा हॉटेलमध्ये घुसून गोळीबार

bomb blast in Afghanistan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावेळी हल्लेखोरांनी काबूल शहरातील स्टार-ए-नाईन हॉटेलला टार्गेट बनवले. स्फोटानंतर या हॉटेलमधून हल्लेखोरांनी घुसून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. गोळीबारीनंतर सुरक्षा यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या असून त्याच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या काही दिवसापासून अफगाणिस्तानमध्ये गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावेळी हल्लेखोरांनी स्टार-ए-नाईन हे चिनी व्यावसायिकांच्या पसंतीच्या असलेल्या हॉटेलला टार्गेट केले. याठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केलेल्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार देखील केला. चीनचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच व्यायसायिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. काबुल शहरातील शेअरनो भागात हे हॉटेल आहे.

या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. अफगाणिस्तानच्या राजधानीत अनेकदा चिनी व्यापारी त्याच ठिकाणी येतात आणि जातात. काही दिवसांपूर्वी काबूलमधूनही हल्ल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापूर्वी डिसेंबरच्या सुरुवातीला काबूलमधील पाकिस्तानी दूतावासावरही हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात राजदूत उबेदुर रहमान निजमानी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

मात्र, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने स्वतः ती गोळी खाल्ल्याने त्यांचे प्राण वाचले. सध्या सुरक्षारक्षक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांच्या वतीने तालिबान सरकारला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले.