नवी दिल्ली । जर तुम्हाला रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायची असेल तर सरकारच्या ‘या’ दोन योजना तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतात. रिटायरमेंटसाठी चांगला निधी जमवण्यासाठी आपण नोकरी सुरू करताच रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) या दोन सरकारी योजना पगारदार लोकांमध्ये रिटायरमेंटच्या उद्देशाने गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहेत. PPF मध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो. त्याच वेळी, नॅशनल पेन्शन योजना (NPS) सरकारद्वारे चालविली जात आहे. त्याविषयीची माहिती जाणून घ्या…
नॅशनल पेन्शन सिस्टम
तुम्ही कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये नॅशनल पेन्शन योजनेसाठी खाते उघडू शकता. NPS खात्याच्या मॅच्युरिटीवर, गुंतवणूकदाराला किमान 40 टक्के रक्कम अॅन्युइटीमध्ये टाकावी लागते. या रकमेतून ग्राहकाला पेन्शन मिळते. अॅन्युइटी हा तुमचा आणि इन्शुरन्स कंपनीमधील करार आहे. या करारांतर्गत, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये किमान 40 टक्के रकमेची अॅन्युइटी खरेदी करणे आवश्यक आहे. रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शनची रक्कम जास्त असेल.
अॅन्युइटी अंतर्गत गुंतवलेली रक्कम रिटायरमेंटनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळते आणि NPS ची शिल्लक रक्कम एकरकमी काढता येते. मात्र, ही पेन्शन टॅक्सच्या कक्षेत येते. तसेच यामध्ये निश्चित रिटर्न नाही. इक्विटी आणि डेटमधील गुंतवणुकीतून फंडाने मिळवलेल्या रिटर्नवर ते अवलंबून असते.
NPS चे फायदे
NPS च्या मॅच्युरिटीवर, 60 टक्के रक्कम टॅक्स फ्री असते. केवळ 40 टक्के रकमेवर टॅक्स आकारला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात योगदानाची मर्यादा 14 टक्के आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत टॅक्स सूट मागू शकता. कलम 80CCE अंतर्गत टॅक्स सवलतीची मर्यादा 1.5 लाख आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
PPF ही 15 वर्षांची बचत योजना आहे. यावरील व्याजदर सरकार दर तिमाहीत निश्चित करते. सध्या व्याजदर 7.1 टक्के आहे. जर तुम्ही दरवर्षी PPF मध्ये 1.5 लाख जमा केले तर 15 वर्षांनंतर ते 7.1 टक्के व्याजदराने 40.68 लाख रुपये होईल. ही मॅच्युरिटी रक्कम टॅक्स फ्री आहे. यानंतर, पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये PPF पुढे चालू ठेवता येईल. जर आपण महागाई आणि PPF च्या परी टॅक्स रिटर्न वर नजर टाकली तर ते अजूनही एक उत्तम गुंतवणूकीचे साधन आहे. लॉन्ग टर्म साठी रिटायरमेंट फंड तयार करण्याचा PPF हा एक चांगला मार्ग आहे. मात्र, यामध्ये मासिक पेन्शनची तरतूद नाही.
मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज देखील टॅक्स फ्री आहेत
PPF खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 150000 रुपये जमा करता येतात. PPF मधील गुंतवणूक आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम आणि व्याज देखील टॅक्स फ्री आहे. PPF चा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. मात्र, 7 वर्षांनंतर प्री-मॅच्युअर पैसे काढता येतात. PPF वर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. कंपाउंडिंग दरवर्षी केले जाते.