हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावरून मोदींवर तोफ डागली आहे.
यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करता मोदींवर निशाणा साधला. काय नेता मिळाला आहे या देशाला. लोकं यांना विसरून जातील याची यांना चिंता आहे. यांना लोकांवर भरवसा नाही की मृत्यूनंतर यांची आठवण कोणी ठेवेल की नाही. यासाठीच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली.
क्या नेता मिला है देश को। इनको चिंता है कहीं लोग इन्हें भूल न जाए। इन्हें लोगों पर भरोसा नही है कि गुजर जाने के बाद कोई इन्हे याद रखेगा या नही। इसीलिए मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया।#MoteraCricketStadium
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 24, 2021
दरम्यान, हे स्टेडियम मोदी यांचं स्वप्न होतं. आम्ही या स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव देण्याचं निश्चित केलं. या भव्य परिसरात भविष्यात राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक स्पर्धांचेही आयोजन करता येऊ शकेल अस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’