मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला, पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून केली ‘या’ व्यक्तीची नेमणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी रेखा ठाकूर यांची नेमणुक केली आहे.

आगामी काळात सात जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. अशात आपण पुढील तीन महिणे काही वयैक्यिक कारणांमुळे अध्यक्षपदाची धुरा सांभाळू शकणार नाही. त्यामुळे पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी ठाकूर यांची नेमणुक केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी असं आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रदर्शित करुन आंबेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Leave a Comment