नागपूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीवर टीका करून वंचितला सोडचिठ्ठी देऊन अनेक नेते वंचित आघाडीतून बाहेर पडले. मात्र वंचित आघाडीने कोणीही बाहेर पडल्याने यज्ञ बंद पडणार नाही असेच चित्र सध्या उभा केले आहे. कारण वंचितच्या इच्छुक उमेदवारांच्या आज नागपूरमध्ये मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यामुळे वंचित आघाडी सर्वच पक्षांच्या पुढे एक पाऊल चालू पाहत आहे.
दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करायची कि नाही याचा निर्णय पक्ष श्रेष्टी घेणार आहेत. त्यांच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे असे वंचितचे नेते नेते अण्णाराव पाटील यांनी म्हणले आहे.
दरम्यान वंचित आघाडीतून निवडणूक लढण्यास अनेक लोक इच्छुक असल्याचे मुलाखतीला आलेल्या लोकांच्या गर्दीवरून दिसत होते. तसेच इतर पक्षातील नेते देखील वंचित मध्ये येऊन लढायला सज्ज झाले आहेत. असेच चित्र आज नागपूरमध्ये जमलेल्या गर्दीवरून दिसत होते. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या मिळालेल्या मतातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचे ध्रुवीकरण झाले. त्यामुळे काँग्रेस आघाडीला १० जागांवर फटका बसला. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आघाडी बेताब झाली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार याकडे सर्वचेच लक्ष लागले आहे.