“मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं” असं म्हणत माजी मुख्यमंत्र्यांनी परत केला पद्मविभूषण पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायदा विरोधात वातावरण तापलं आहे. देशभर आंदोलन करत शेतकरी या कायद्याचा निषेध करत आहेत. त्यातच आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही या गोष्टींचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे.

“मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे कृषी कायदे त्यांच्या सोयीचे नाहीत. मी आज जो काही आहे तो लोकांमुळे आहे. लोकांनी मला निवडून दिलं आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश आहे. आज त्या शेतकऱ्यालाच या सरकारकडून फसवलं जातं आहे. अशा वेळी पद्मविभूषण पुरस्कार बाळगण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही त्यामुळे मी तो परत करण्याचा निर्णय घेतला आहे.”

दुसरीकडे काँग्रेसनंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. ससंदेचं विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like