नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. पण जंगले नाहीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जावडेकर म्हणाले मी जगभरात फिरलो आहे तेव्हा लक्षात आले की, न्यूयॉर्क, नैरोबी रिओ द जेनेरिओ यासारख्या ठिकाणी वने आहेत. अगदी मुंबईतही राष्ट्रीय वन आहे. पण देशात इतर ठिकाणी याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरांमध्ये ही नागरी वन योजना सुरु करत आहोत त्यासाठी कंपाउंड करण्यास तसेच तिथे किमान सेवा देण्यासाठी निधी देण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “आपण शहरांतील वनक्षेत्र आणि विखुरलेल्या जमीनींचा नकाशा बनवूया. आणि जर ती शहरी जंगले तयार करण्यासाठी राखीव ठेवली गेली असतील तर लोकांची एक चळवळबनते. मी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे केले आवाहन करत आहे. आम्ही लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या उत्तम वनास पारितोषिक देण्याचा विचार करत आहोत.” असे मंत्री जावडेकर यांनी सांगितले.
On #WorldEnvironmentDay announced the Urban Forest scheme to develop 200 ‘Nagar Van’ across the country in next 5 years.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) June 5, 2020
This will help revive the age old tradition of village forest in cities.#ForNature pic.twitter.com/G18JHsebti
दरम्यान जगातील जैवविविधतेच्या ८% जैवविविधता जतन करण्यास भारत सक्षम आहे. जगातील लोकसंख्येच्या १६% लोकसंख्या भारतात आहे. जगातील एकूण १६% जनावरे भारतात आहेत. आणि या दोन्हीसाठी अन्न, पाणी आणि जागेची गरज आहे. तर जगातील एकूण २.५% भूभाग आणि ४% पाण्याचे स्रोत आहेत असेही ते म्हणाले. या संकटकाळात ही देश ८% जैवविविधता टिकवून ठेवू शकतो आणि हे काही छोटे पाऊल नाही आहे. आपण जगासमोर हे सिद्ध करू शकतो. याबरोबरच आपले जीवन निसर्गाशी निगडित आहे. वृक्ष आणि इतर सर्व प्रजाती आपल्या जगण्याचा भाग आहेत. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली.