सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जावळी तालुक्यातील महू धरणात सोमवारी दुपारी आजोबा बरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय- 11) हा मुलगा पोहण्यासाठी गेला असता, तो पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलीस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवचा ठावठिकाणा लागत नव्हता.
आज बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला, असल्याची माहिती करहर पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार डी. जी. शिंदे यांनी दिली. कुडाळचे पीएसआय महेश कदम, करहरचे डी. जी. शिंदे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून तेथेच ठिय्या मांडून होते. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर प्रणवच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थही त्यांना सहकार्य करीत होते. अखेर आज सकाळी प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला