चलती का नाम गाडी; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाडीचं स्टेरिंग खुद्द प्रणिती शिंदेंकडेच

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तसा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात जोर लावला आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधतांना त्या दिसत आहेत. असेच सकाळी शहरातील पार्क स्टेडियम भागात कार्यकर्त्यांसोबत फिरत असतांना, तुम्ही एकट्याच महिला का फिरता असा सवाल एका जेष्ठ व्यक्तीने केला. त्यावर ‘एक नारी सबको भारी’ असे चटकन उत्तर देत प्रणिती मिश्कीलपणे हसल्या.

त्याचबरोबर ‘मतपत्रिकेवर आपला क्रमांक ४ आहे. वरच्या सर्वाना वन टू का फोर करून टाका आणि मलाच निवडून द्या’ असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. दुपारची कॉर्नरसभा, सायंकाळची जाहीर सभा आणि पहिल्या सत्रात मॉर्निंग वॉकला निघालेल्यांशी प्रणिती आता संपर्क साधत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांनी प्रचारचं स्टेरिंग हातात घेतले आहे. प्रणिती स्वतः कार चालवत पार्क चौक किल्ला खंदक सिद्धेश्वर मंदिर परिसर, पालिका परिसर येथे गेल्या. तेथील नागरिकांशी संपर्क साधत आपल्याला मतदान करण्याचं आवाहन त्या करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here