रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; कारण अस्पष्ट

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारणातील चाणक्य आणि यशस्वी रणनीतीकार प्रशांत किशोर हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कालच राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापनदिनी बोलताना शरद पवारांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या सोबतची आजची भेट अंत्यत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कोण आहेत प्रशांत किशोर –

प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीतज्ञ म्हणून ओळखले जातात. आत्तापर्यंत त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here