Sunday, May 28, 2023

झोपडीत राहणारा हा नेता झालाय केंद्रात मंत्री!

नवी दिल्ली | प्रताप सारंगी हे नाव कदाचित तुम्हा, आम्हाला नवं आहे. मात्र ओडिशातील नागरिकांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून सारंगी यांनी ओडिशातील बालासोर भागामध्ये अनेक सामाजिक कार्य उभी केली आहे. यापूर्वी ते दोन वेळा आमदारही झाले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं होतं. पण 1.42 लाख मतांनी ते पराभूत झाले होते.

निवडणुकीतील विजय आणि पराभव अनेकांचं वागणं बदलण्यास कारणीभूत ठरतात. पण सारंगी याला सुखद अपवाद आहेत. त्यांनी पराभव सहज पचवला आणि त्यांच्या मुळ सामाजिक कामात गर्क झाले. यंदा भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिलं. खुद्द नरेंद्र मोदींनी सारंगी यांच्यासाठी बालासोरमध्ये सभा घेतली होती.

35 वर्षीय सारंगी अविवाहित आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानतर सारंगी यांचे एक छायाचित्र सोशल मी़डियावर व्हायरल झाले होते. एका छोट्याशा बॅगमध्ये पु्स्तकं आणि काही कपडे ते भरत होते. कारण इतकी वर्ष समाजकार्यात घालवलेला हा माणूस आता दिल्लीला निघाला होता. खासदार म्हणून आता याच साध्या माणसाने आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.