सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट झाली होती. मात्र, भेटीदरम्यान अफजलखानाने दगा करुन छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला. त्यानंतर छ. शिवरायांनी अफजलखानाचा हल्ला परतवून लावत त्याचाच कोथळा बाहेर काढला. त्यानंतर शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर यांनी अफजलखानाच्या पालखीचे जे भोई होते. त्यांचे पाय कापले आणि खान पालखीसह खाली पडला. शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकरांनी अफजलखानाचे मुंडके कापले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत शत्रू अफजलखानाची आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा या दोघांची कबर त्याच ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली. साधारणपणे 1918 ते 1920 या कालावधीपर्यंत या कबरीवर केवळ एक छोटेखानी छप्पर आढळून येत होते. मात्र, मागील काही वर्षात याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दहा ते बारा रुम्स बांधण्यात आल्या. याठिकाणी दरवर्षी ऊरुसाचीही परंपरा सुरू झाली. त्यामुळे काही संघटनांनी या अतिक्रमणाला विरोध करत हायकोर्टात धाव घेतली.
अफझलखान व सय्यद बंडा यांच्या कबरीचा Exclusive Video पहा pic.twitter.com/e9TxoY5m0F
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) November 10, 2022
सन 2017 साली हे अतिक्रमण हटवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र आज अखेर या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर 1959 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला नेमक्या त्याच दिवसाचा मुहूर्त पाहून आज 10 नोव्हेंबर 2022 रोजी हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.