महाविकास आघाडीचे नेते घेतात मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदेंची भेट; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतरही शिंदे गटाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर अजूनही आघाडीला कहाणी नेते आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटातील नेते सांगत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रताराव जाधव यांनी केला आहे.

खा. प्रतापराव जाधव यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ झाले आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री भेटत आहेत. तसेच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन ते भेट घेत आहेत. हे मी स्वत: अनुभवलं आहे.

महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्याकडून काढण्यात येत असलेल्या भारत जोडो यात्रेवरून जाधव यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी पाकिस्तान, बांगलादेशात भारत जोडो यात्रा काढावी, अशी टीका त्यांनी केली.