Prathamesh Parab : मेहंदी सजली, हळद लागली.. लगीनघटीका समीप आली; प्रथमेश – क्षितीजाच्या लग्नविधींना सुरुवात

Prathamesh Parab
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab) प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा येत्या २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे दोघांच्याही लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. परब आणि घोसाळकर दोन्ही घरामध्ये लगीनघाई आहे. काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डे दिवशी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला. ज्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर आता मेहंदी सोहळ्याचे आणि हळदीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kkanchan Mehendi 🦋 (@kkanchan_mehendi_)

प्रथमेश परबची रिअल लाईफ प्राजु अर्थात क्षितिजा ने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर तिच्या मेहंदी सोहळ्याची खास झलक शेअर केली आहे. तर प्रथमेशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान क्षितिजाने तिच्या मेहंदीसाठी फारच सुंदर असा लूक केला होता. (Prathamesh Parab) यासाठी तिने हिरव्या रंगाचा खणाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यावर प्रतिजा असे लिहिलेले दिसत आहे. तर ‘प्रथमेशची पराजू’ असं लिहिलेले हटके कानातलेसुद्धा तिने परिधान केले होते. तिच्या हातावर अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी मेहंदी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये नवरा नवरीचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे.

(Prathamesh Parab)तर प्रथमेशने त्याच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये पिवळ्या रंगाची फुलं असलेला पांढऱ्या रंगाचा सदरा पायजमा परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय या फोटोंमध्ये त्याने मित्रांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याचे मित्र हळद एन्जॉय करताना आणि प्रथमेशसोबत मस्ती करताना दिसत आहेत. त्यातील एका फोटोत प्रथमेश मित्राच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे आणि तो हळदीत पूर्ण माखल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर क्षितिजाची मेहंदी आणि प्रथमेशच्या हळदीचे हे व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

याशिवाय क्षितिजा आणि प्रथमेश यांच्या प्रि- व्हेडिंगची देखील एक झलक त्यांच्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. जॅमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा तर क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली. दोघांचं हे प्री- व्हेंडिंग शूट अत्यंत रोमँटिक पद्धतीने करण्यात आलं आहे. (Prathamesh Parab) शांत समुद्रकिनारी दोघांच्याही रोमँटिक पोजमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.