दारू बाटल्यांच्या प्रकरणाची 15 दिवसात उच्चस्तरीय चौकशी करा; दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

0
130
Darekar and Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा ? असा सवाल आता उपस्थित होत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यासंदर्भात पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

मंत्रालायात आपले प्रश्न सोडवण्यासाठी दर दिवशी हजारो नागरिक मंत्रालायत येत असतात, पण या नागरिकांना मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव अडवणूक केली जाते. त्यांच्याकडील सर्व सामानाची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यानंतरही त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कधी-कधी प्रवेश नाकारण्यात येतो. सामान्य नागरिकांच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली जात असताना मंत्रालय उपहार गृह परिसरापर्यंत दारुच्या बाटल्या सर्रासपणे कशा पोहचतात? असा सवालही दरेकर यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची 15 दिवसांच्या आत उच्च स्तरिय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विपेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here