सातारा | राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने सातारा राष्ट्रवादी भवन येथे भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महिलांविरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला काळे फासून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख म्हणाल्या, प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ असून ते कुठं जातात हे आम्हाला माहिती आहे. दरेकरांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा दरेकरांना साताऱ्यात पाऊल ठेऊ देणार नाही. चित्रा भिसे या महिलांच्यावर अन्याय झाल्यानंतर नेहमीच पुढाकार घेत असतात. आता त्याच्याच पक्षातील दरेकर यांनी महिलांविरोधी वक्तव्य केले आहे, यावर त्या काय बोलत नाहीत.
भारतीय जनता पक्षातील नेते असे बेताल वक्तव्य करत आहेत. तरीही त्याच्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपा व प्रविण दरेकर यांच्यावर यावेळी हल्लाबोल केला. तसेच प्रविण दरेकर यांच्या फोटोवर काळे फासून करून जोडे मारण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा काळे व युवती काॅंग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.