सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अंत्यसंस्कार करण्यासाठी आता साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी संगमाहुली येथे पूर्वपरवानगीची गरज आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खालचा टप्प्यातील 14 अग्निकुंड असलेला पाण्यात गेले असल्याने गैरसोय होवू नये म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा यापुढे काही दिवस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची पूर्व परवानगी घ्यावी लागणार असल्याचे राजेंद्र चोरगे यांनी सांगितले आहे.
साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीतील 14 अग्निकुंड पाण्यात बुडाले असल्याने कोविडचे मृतव्यक्तिच्या अंत्यसंस्कार करणेसाठी वरील एका बाजूकडील 5 अग्निकुंड देण्यात आले आहेत. त्यामुळे रेग्युलर (नॉनकोविड) अंत्यसंस्कार हे वरील टप्प्यावरील दुसऱ्या बाजूकडील 6 अग्निकुंडामध्ये करण्याचे नियोजन केले आहे. अग्निकुंडाची कमतरतेमुळे नॉनकोविड अंत्यसंस्कार हे दिवसातून 2 वेळा करावे लागणार आहेत.
तेव्हा अंत्यसंस्कार केल्यानंतर घरच्या नातेवाईकांनी 5 तासानंतर अग्निकुंडामधील रक्षा काढून घ्यावी लागणार आहे. तसेच सध्या नैसर्गिक आपत्ती पाहता मृतदेह अंत्यसंस्कार करणेसाठी स्मशानभूमीत आणताना अगोदर कैलास स्मशान भूमीत कागदपत्रे घेऊन जावे व नोंद करूनच दिलेल्या वेळेत अंत्यसंस्कार करणेसाठी जावे, असे आवाहन स्मशानभूमी व्यवस्थापनाने केले आहे.