अतिवृष्टी : चांदोली धरणाच्या दोन वक्र दरवाजातून नदी पात्रात 6 हजार पाण्याचा विसर्ग सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार

वरुण राजाच्या बर्‍याच दिवसाच्या विश्रांती नंतर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तिसर्‍या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी 4 वाजता खुले करण्यात आले आहेत. वक्राकार दरवाजातून 4 हजार 883 व कालवा गेट मधुन 1 हजार 125 क्युस्केस असा एकुण 6 हजार 8 क्युसेस विर्सग वारणा नदीत पात्रात सुरू केला आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सावधानता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.

धरण परीसरात सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे, असाच पावसाचा जोर वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. कोणत्याही क्षणी धरणातील विसर्ग आणखीन वाढवला जाणार असल्याचे वारणा पाटबंधारे वारणावती विभागाचे उपविभागीय अभियंता मिलींद किटवाडकर यांनी दिला आहे. पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दोन नंबरचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सरहद्दीवर असणारे 34. 40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण सध्या 29.30 टि.एम.सी. ने भरले असुन पाणी पातळी 650 मिटर इतकी झाली आहे. धरण 86 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसान पासुन अतिवृष्टी होत आहे. सध्या चांदोली धरण क्षेत्रात पाथरपुंज पासून पाण्याची आवक होत असते.पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस पडत आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन 30 हजार क्युस्केस पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

बुधवारी धरणातील पाण्याने सांडवा पातळी पार केली. चार पैकी आज दोन वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी 3.30 वाजता खुले करण्यात आले असुन एकुण 6 हजार क्युस्केस प्रति सेंकद वारणा नदीत पात्रात विसर्ग सुरु आहे. गेल्या 24 तासात सर्वांधीक वारणावती पर्जन्य मापन केंद्रावर 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असुन मुसळधार पावसामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असुन नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.

Leave a Comment