पुणे :राज्यात उद्यापासून कोकण,मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
कोमोरीनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि सुमात्रा किनारपट्टी या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रीय होत आहे.
ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे तसंच झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 900 मीटर ते 1.5 किलो मीटर च्या दरम्यान आहे. याशिवाय उत्तर अंदमान समुद्र आणि दक्षिण म्यानमारची किनारपट्टी या भागातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रीय असल्याचा समुद्रावरील असलेले बाष्प हे चक्रीय स्थिती खेचून आणत आहेत त्यामुळे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहेत.
मागील 24 तासात चंद्रपूर येथे सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे येथे 18.7 अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page