नाशिक : हॅलो महाराष्ट्र – देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी काही खेडेगांवामध्ये अजून मूलभूत सुविधादेखील पोहोचल्या नाहीत. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी झपाट्याने विकास होत असताना हि गावे मात्र आजही मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ (pregnant woman carried on a blanket) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील हत्तीपाडा या ठिकाणचा आहे.
ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले, मन हेलावून टाकणारा Video आला समोर pic.twitter.com/lvU0EH9LrN
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 13, 2022
नाशिकच्या हत्तीपाडा येथे रस्ताच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी चक्क झोळीमध्ये (pregnant woman carried on a blanket) न्यावं लागत असल्याची परिस्थिती आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका गरोदर महिलेला नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी (pregnant woman carried on a blanket) केली आहे आणि ते यातूनच महिलेला रुग्णालयात घेऊन जात आहेत. हत्तीपाडा येथील ग्रामस्थांनीच हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे.
अशाप्रकारचं भीषण वास्तव दाखवणारा हा पहिलाच व्हिडिओ नाही. तर या आधीही एका घटनेत रस्ता नसल्याने या भागात तीन वर्षापूर्वी सर्पदंश झाल्यामुळे एका 17 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. प्रशासनाने या व्हिडिओची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?