हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Insurance Schemes : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि PM सुरक्षा विमा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता सरकारने या योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. म्हणजेच, आता या योजनांचा फायदा घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. मात्र, त्यांच्या प्रीमियमची किंमत आधीच खूप कमी आहे, त्यामुळे प्रीमियम वाढल्यानंतरही याचा आपल्या खिशावर फारसा परिणाम होणार नाही.
हे लक्षात घ्या कि, सरकारने या दोन्ही योजनांच्या प्रीमियममध्ये 1.25 रुपये प्रति प्रीमियमने वाढ केली आहे. या दोन्ही योजना लाइफ कव्हरशी जोडलेल्या आहेत. याद्वारे आपल्याला अगदी कमी प्रीमियममध्ये 4 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवता येतो. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेउयात…
किती प्रीमियम द्यावा लागेल ???
जर आपण या योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर आता जास्त प्रीमियम भरावा लागेल. यापूर्वी या योजनांमध्ये संयुक्तपणे 342 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागत असे. आता तो वाढून 456 रुपये होणार आहे. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले सरकारी बँकेमध्ये खाते असावे लागेल. Insurance Schemes
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. 18-50 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला हे खरेदी करता येते. यासाठी आता वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल. हे लक्षात घ्या कि, हा विमा फक्त एका वर्षासाठी असेल. त्यानंतर त्याचे रिन्यूअल करावे लागेल. Insurance Schemes
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
यामध्ये, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. तसेच मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला दिली जाईल आणि अपंगत्व आल्यास ती विमाधारकाला दिली जाईल. त्यावेळी, जर विमाधारकाला अंशतः अपंगत्व आले तर त्याला 1 लाख रुपये मिळतील. हे लक्षात घ्या कि, कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 70 वर्षे वय असलेल्या व्यक्तींना या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. यासाठी दरवर्षी फक्त 20 रुपये प्रीमियम भरावा लागेल. Insurance Schemes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Home/Pradhan-Mantri-Jeevan-Jyoti-Bima-Yojana
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा