Prepaid Plans : Jio, Airtel, Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत,आज आपण 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मोठे फायदे देणाऱ्या रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात…

Bharti Airtel Most Affordable Year Long Validity Prepaid Plan

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 2GB डेटा आणि 100 SMS देखील मिळत आहेत. यासोबतच फ्री Hello Tune, Wink Music सहीत 1 वर्षासाठी Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.

Airtel चा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtel च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 1.5GB डेटा आणि 100 SMS मिळत आहेत. यासोबतच फ्री Hello Tune, Wink Music आणि Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. Prepaid Plans

Vodafone Idea ने पेश किया नया हीरो अनलिमिटेड प्रीपेड प्लान, जानें क्या है इसके बेनेफिट्स | TV9 Bharatvarsh

Vi चा 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone-Idea च्या या 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये डेली 100SMS, 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहेत. यासोबतच Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन तसेच Binge All Night आणि डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे.

Vi चा 475 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone-Idea च्या या 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये डेली 100SMS, 4GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, यामध्ये Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन दिले जात नाही. मात्र, यामध्ये Binge All Night आणि वीकेंड डेटा रोलओव्हर सारखे फायदे दिले जातील. Prepaid Plans

Jio Cheapest Plan: Jio cheapest prepaid plan with 56 days validity calling data free, see plan - Business League

Jio चा 479 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 1.5GB डेटा आणि 100 SMS मिळत आहेत. यासोबतच Jio TV वरून क्लाउडवर फ्री एक्सेस दिला जातो आहे.

Jio चा 419 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 3GB डेटा आणि 100 SMS देखील मिळत आहेत. यासोबतच या रिचार्ज प्लॅनसह Jio TV, Movies, Security आणि Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. Prepaid Plans

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा