नैसर्गिक साधन सामग्रीला नुकसान होऊ न देता वाहतूकिस पर्यायी रस्ता अहवाल तयार करा – केंद्रीय सदस्य अलोक कुमार

0
27
Alok kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने बऱ्याच विकास कामांची आखणी केलेली आहे. आज चिकलठाणा विमानतळ दालनात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंदीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, नागपूर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल आणि खासदार इम्तियाज जलील यांची जिल्ह्यातील एनएचएआय मार्फत प्रस्तावित आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पावर महत्वपूर्ण बैठक पार पडली.

हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने, नागरिकांची मागणी आणि गरज यामुळे अतिमहत्वाचा आहे.
हे लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्गचे केंद्रीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार यांनी प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना औरंगाबाद ते शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करुन वाहतूक आणि तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

औरंगाबाद येथील वर्दळ असलेल्या जालना रोडवर ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे वेळ जातो. त्यामुळे लेमन ट्री हॉटेल ते केंब्रिज शाळेपर्यंत उड्डाणपूल बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त आणि इतर संबंधित विभागासोबत संयुक्तरित्या बैठक घ्यावी तसेच स्थळ पाहणी आणि तांत्रिक सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात यावे. त्याचबरोबर
सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या तिसऱ्या पॅकेजचा सर्वात महत्वाचा टप्पा असलेल्या कन्नड येथील डोंगर पोखरुन औट्रम घाटातील बोगदा तयार करताना नैसर्गिक साधन सामग्रीला नुकसान न देता वाहतूक करण्यास पर्यायी रस्ता देखील तयार करण्यासाठी त्वरित अहवाल तयार करुन सादर करण्याचे निर्देश अलोक कुमार यांनी दिले आहे. यामुळे औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी चर्चेत आणि दिलेल्या पत्रात नमूद केलेल्या सर्व मुद्दयांवर त्वरित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागपूरचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here