सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कवठे (ता. वाई) परिसरात सायंकाळी तुफान पाऊस झाला. तर कराड शहरासह परिसरात हलक्या सरी कोसळल्या. शेतकरी वर्गाची ज्वारी गहु व हरभरा या पिकांची काढणी सुरु असल्याने आज झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भितिने शेतकरी धास्तावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 21 ते 25 मार्चच्या दरम्यान पाऊस होणार असल्याने शेतकरी वर्गाची कामाची लगबग सुरु होती. ब-याच शेतक-यांच्या ज्वारी उपटुन काटणीच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
हवामानात झालेला बदल आणि पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण पहायला मिळाले आहे. अपु-या उसतोड मजुरांच्यामुळे उसाला तोडी मिळत नव्हत्या, त्यामुळे शेतात तुरे आलेली चिपाड झालेले उस उभे असुन आजच्या पावसाने परिसरात चिखल झाल्याने वहाने उसाच्या फडात शिरु न शकल्याने आठवडाभर उसतोड बंद राहण्याची शक्यता आहे.
[better-ads type=’banner’ banner=’196069′ ]
काढणीसाठी मजुर उपलब्ध होत नसल्याने परिसरातील बहुतांश पिके अजुन काढणीच्या प्रतिक्षेत होती. त्या पिकांच्या प्रतवारीवर आजच्या पावसाने पाणी फिरवल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेले पाच दिवस वातावरणात असलेला प्रचंड उकाडा आजच्या पावसाने काही अंशी कमी झाला असला, तरी अवेळी आलेला आजचा पाऊस परिसरात नुकसानकारीच ठरला आहे.