औरंगाबादेत मुसळधार पावसाची हजेरी; 34 मिलिमीटर पावसाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जाणवत आलेल्या उकड्यानंतर रात्री आठच्या सुमारास शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर रात्री उशिरा 9 वाजेनंतर जास्त मुसळधार पावसाला सुरूवात झाली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहराच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेअकराच्या सुमारास एमजीएमच्या वेध शाळेत ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली.

रविवरच्या पहाटे व रात्री उशिराने पावसाच्या जोरदार हजेरीनंतर सोमवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागला होता.रात्री आठनंतर शहरातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली. सिडको हडको, या भागात सर्वात आधी पावसाने हजेरी लावली. 9 वाजेनंतर शहराच्या सर्वच भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामध्ये देवळाई , सातारा, जिन्सी, औरंगपूर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा इत्यादी परिसरात जोरदार पाऊस झाला. किमान 34.8 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली होती.

शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये त्याबरोबरच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पाऊस पडल्याने औरंगाबाद येथील पर्यटन स्थळावर लोकांची गर्दी दिसून येत आहे.

Leave a Comment