निर्भया सामूहिक बलात्कारः राष्ट्रपतींनी दोषीची दया याचिका फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चार दोषींपैकी मुकेश सिंगने काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील एका आरोपीची दया याचिका शुक्रवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे पाठविली मंत्रालयाने ही याचिका नाकारण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. त्यावर आज निर्णय घेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे.

गुरुवारी दिल्लीच्या उपराज्यपालांनी मुकेशसिंग यांची दया याचिका गृह मंत्रालयाकडे पाठविली. यापूर्वी एक दिवस आधी दिल्ली सरकारने याचिका फेटाळण्याची शिफारस केली होती. दिल्लीतील न्यायालयाने मुकेशसिंग वय ३२, विनय शर्मा वय २६, अक्षय कुमार सिंग वय ३१ आणि पवन गुप्ता वय २५ यांना फाशीची शिक्षाची सुनावत फाशीचे वारंट बजावले होते. त्यानंतर कोर्टाने त्याच्या फाशीची तारीख २२ जानेवारी निश्चित केली होती.

 

‘आप’ सरकारने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, मुकेश कुमार सिंह, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांना ठरलेल्या २२ जानेवारी या दिवशी ठरलेल्या फाशी दिली जाऊ शकत नाही. कारण यापैकी एका दोषीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दिली आहे आणि कारावासाच्या नियमांनुसार सर्व कायदेशीर पर्याय संपेपर्यंत त्यांना फाशी देता येणार नाही. अशा परिस्थितीत मुकेश सिंग यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर डेथ वॉरंटवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

 

Leave a Comment