हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या आजारावरील औषधांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे रुग्णाला त्या औषधांची खरेदी करणे शक्य होत नाही. अनेकवेळा तर मेडिकल खर्च न परवडल्यामुळे रुग्णाला आपली ट्रीटमेंट अर्ध्यातच थांबवावी लागते. मात्र आता इथून पुढे अशी वेळ येणार नाही. कारण की, NPPA कडून काही गंभीर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, मधुमेह, वेदना, ताप, संसर्ग, हृदयविकार यासह अनेक मल्टीव्हिटॅमिन आणि डी-3 औषधांचा समावेश आहे. त्यामुळे आता इथून पुढे फार्मास्युटिकल कंपनी सामान्य नागरिकांकडून फक्त औषधाची किंमत आणि त्यावर लागू होणारा जीएसटी आकारू शकणार आहे.
NPPA च्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
नुकतीच NPPA ची (National Pharmaceutical Pricing Authority) 115 वी बैठक पार पडली असून या बैठकीत औषधांवरील किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आपल्याला इथून पुढे, डिप्रेशनवरील औषधे, मधुमेह, मायग्रेनच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे स्वस्त मिळणार आहेत. सध्या केंद्र सरकार वाढत जाणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठीच NPPA च्या 115 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येच काही उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
कोणत्या औषधांच्या किमती कमी
NPPA ने आपल्या बैठकीत, डोकेदुखी, मायग्रेन, मस्कुलोस्केलेटल वेदना किंवा मासिक पाळीच्या वेळी खाल्या जाणार्या aceclofenac, aceclofenac किंवा paracetamol, Serratiopeptidase च्या एका टॅब्लेटची किंमत 8.38 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, Cadila Pharmaceuticals IPCA Laboratories, Mankind Pharma, Alkem Laboratories, Cipla, Sanofi आणि Abbott India सारख्या फार्मा कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
टाइप 2 मधुमेहावरील औषधांची किंमत कमी
इथून पुढे, टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना सिटाग्लिप्टीन फॉस्फेट आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड हे औषध घेण्यासाठी फक्त प्रति टॅब्लेट 9 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, एपिलेप्सीमध्ये वापरल्या जाणार्या लेव्हेटिरासिटाम, सोडियम क्लोराईड इन्फ्युजन आणि पॅरोक्सेटीन किंवा क्लोनाझेपाम कॅप्सूलची किंमत 0.89 रुपये आणि 14.53 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाला ही औषधे पूर्वीच्या दरांपेक्षा स्वस्त बसणार आहेत.