हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो असता मला त्यांच्यातील अहंकार दिसला असा बेधडक आरोप भाजपचेच नेते आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर कृषी कायद्यांबाबत मोदींशी चर्चा करताना पाच मिनिटातच माझा वाद झाला असेही ते म्हणाले. थेट भाजपच्या राज्यपालांनीच पंतप्रधानांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे
सत्यपाल मलिक हरयाणातील दादरी येथील एका धार्मिक ठिकाणी भेट द्यायला आले होते. तेव्हा ते म्हणाले की, मी शेतकरी आंदोलनाबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. परंतु पंतप्रधान मोदी हे अतिशय अहंकारी आहेत. मी त्यांना म्हटले की शेतकरी आंदोलनात ५०० शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते माझ्यासाठी मेले का? असा प्रतिप्रश्न मोदींनी मला केला , तेव्हा मलिक यांनी हो तुमच्यामुळेच मेले कारण तुम्ही राजा झाले आहात असेही मलिक यावेळी म्हणाले.
कोण आहेत सत्यपाल मलिक
सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये 24 जुलै 1946 ला एका शेतकरी जाट कुटुंबात झाला
1974 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार
अमित शाहंच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते
30 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना बिहारचं राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं
गोवा, ओडिशा, कश्मीर सारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली
सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत